Blog Detail

Home Detail

स्थानिक स्वराज्य संस्था या पंचायत राज व्यवस्थेचा कणा आहेतलोकशाही मजबूत करण्यातसरपंच व ग्रामसेवकांची भूमिका महत्याची - रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग.

पुणे (प्रतिनिधी) -स्थानिक स्वराज्य संस्था या पंचायत राज व्यवस्थेचा कणा आहेत. ग्रामपंचायत पासून खऱ्या अर्थाने देशाच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात होत असते . आपल्या गावाला आदर्श बनवण्यासाठी झटणाऱ्या सर्व सरपंच ग्रामसेवकांचा वाटा लोकशाहीत मजबूत करण्यात महत्वपूर्ण असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्य अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.त्या राजर्षी शाहू आदर्श सरपंच,आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या.

शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी  2024 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान,दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राजर्षी शाहू आदर्श सरपंच व ग्रामसेवक पुरस्कार 2024 सोहळा संपन्न झाला.

रूपालीताई चाकणकर पुढे म्हणाल्या कि,राज्यात विधवा प्रथा बंदीसाठी ठराव करून एका मोठ्या सामाजिक चळवळीचे भाग बनण्याचे व पती गमावलेल्या महिलांसाठी आधार बनण्याचे आवाहन उपस्थित सरपंचांन,ग्रामसेवकांना केले.

या कार्यक्रमासाठी लिज्जत पापड कंपनीचे सल्लागार सुरेशनाना कोते , दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर, गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष संतोष पाषाणकर,संभाजी जामदार,शोभा बल्लाळ,रेखा श्रीमंदिलकर,योगीता जामदार,आदित्य श्रीमंदिलकर,अजिंक्य श्रीमंदिलकर उपस्थित होते 

त्या पुढे म्हणाल्या कि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमानात वाढ होत आहे.महाराष्ट्र यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.महराष्ट्रामध्ये 18 ते 26 वयोगटातील मुली व महिलांचे मिसिंगचे प्रमान मोठ्या प्रमानात होत आहे.बाहेरील देशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे अमिश दाखवून त्यांना विदेशात घेऊन जातात व त्यांना वाममार्गाला लावले जात्ो.अशा महिलांना स्वदेशी आणन्याचे मोठे आवाहन राज्य महिला आयोचे अध्यक्ष म्हणून माझ्या समोर होत्ो.मात्र पुण्यातील 28 महिलांना मायदेशी आणून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यचे काम आयोगाची अध्यक्ष म्हणून केले.यासाठी सरपंच,ग्रामसेवक यांनी जागृत राहून काम केले पाहिजे.

विधवा प्रथा,बाल विवाहास पुरूष मंडळींचा दोष नाही तर आमच्या महिला भगीनींच याला जबाबदार आहेत.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच वाचायचे विसरल्या असून एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात टिव्हिचा रिमोट अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळत आहे.माता भगिनींनी बाबासाहेब यांचे संविधान वाचण्याची गरज आहे असे परखड मत त्यनीं यावेळी व्यक्त केले.विधवा प्रथा बंद करून त्या महिलेस जगण्यचे बळ देण्याचे काम यापुढे सरपंच आणी ग्रामसेवक यांनी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी संस्थेच्या वतीने राबवित असलेल्या सामाजीक उपक्रमांची माहिती यावेळी दिली.राजर्षी शाहू महारांजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून2014 साली राजर्षी शाहू प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.ग्रमिण भागाच्या विकासात महत्वाची भुमिका बजाविनारे सरपंच व त्यांना साथ देणारे ग्रामसेवक यांना प्रोच्छाहित करण्यासाठी त्यांना सन्माणीत करण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते .राजर्षी शाहू आदर्श सरपंच,राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून गौरविण्यात येते पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्ष असल्याचे त्यांनी सांगीतले.

Leave A Comment

;